Shirke Construction Pvt. Ltd. has been serving its clients since 1994. It was previously known as R. K. Shirke Construction as it was in partnership with the project Sai Dhara.

Here’s our timeline

1994: The company was listed as R.K Shirke Constructions as a partnership firm started with the project as Sai Dhara Towers (Dombivli), and also we invested on couple of projects at Thane, Panchpakadhi, Khopat, Vartak Nagar.
2003: The company was formed as Shirke Associates and it focused on interior designing.
2014: After immense hard work with great manpower we dissolved the partnership firm of R. K. Shirke Constructions and Shirke Associates and formed a new company with the name of Shirke Constructions Pvt. Ltd.

Our Director

Our director
Name
Rajendra Krishna Shirke
Education
BA LLB
'गुणवत्ता' आणि 'ग्राहकहिताचा' सुरेख मिलाफ !

घराविषयी ग्राहकांच्या तरल भावना जाणणारे संवेदनशील डेव्हलपर, अशी आर. के. शिर्के कन्स्ट्रक्हान्स्‌ ची ख्याती आहे. मुंबईत १९८४ पासून कार्यरत असून या संस्थेचे आधारवड, श्री.राजेंद्र कृष्णा शिर्के, हे कंपनीचे व्यवस्थापकीय-संचालक असून, शिक्षणाने ते स्वत: बी.ए.एल्‌.एल्‌.बी आहेत.

आर. के. शिर्के कन्स्ट्रशन्स्‌ या नावाने त्यांनी व्यवसायाचा श्रीगणेशा केला. तसेच इंटीरीयर डिजाईनिंगच्या कामांसाठी त्यांनी शिर्के असोसिएट्स या फर्मची स्थापना केली.आणि कामातील दर्जा आणि ग्राहकांना दिलेला शब्द पाळण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे, कंपनीला अल्पावधीतच उत्तम यश प्राप्त झाले, कामाचा वाढता व्याप आणि भविष्यातील वाटचाल लक्षात घेऊन त्यांनी २००४ साली शिर्के कन्स्ट्रक्‍शन्स्‌ प्रा. लि. ची स्थापना केली आणि त्यांनी वरील दोन्ही कंपन्या बंद करून त्यात सगळी कामे अंतर्भूत केली

ग्राहकांच्या गर्जा आणि आवडी-निवडी केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक प्रोजेक्टचे डिजाईन केले जाते. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ आणि नवी मुंबई येथे ग्राहकांचा विश्वास संपादित केल्यानंतर आता कंपनीने ओम साई नगरी नावाने उभारणी केली आहे. त्यात 'साई निवारा' या २२५ सदनिकांच्या प्रकल्पाच्या अपूर्व यशानंतर 'साई अभय' हा १०८ सदनिकांचा प्रकल्पही त्यांनी पूर्ण केला. आणि आता 'साई गती' हा अत्याधुनिक सोई-सुविधांचा अंतर्भाव असलेला ७८ सदनिकांचा नवा प्रोजेक्ट त्यांनी सातारकरांसाठी सादर केला आहे.

व्यवसायातील नफ्या-तोट्याच्या पलीकडला विचार करून, कंपनीने सामाजिक बांधिलकीचे भानही ठेवले आहे. याच प्रेरणेतून त्यांनी आजी-माजी सैनिकांसाठी आपल्या प्रकल्पांत विशेष सवलत योजना जाहीर केल्या आहेत.त्याचबरोबर छोटे व्यापारी, लघु-उद्योजक, लहान-मोठे व्यावसायिक, पोलीस दलातील कर्मचारी यांना सदनिका विकत घेण्यासाठी कमितकमी 'पेपरवर्क* च्या आधारे वित्तसहाय्य प्राप्त करून देण्यासाठी ते कसोशीने प्रयत्न करतात. संस्थापक-संचालक श्री.राजेंद्र कृष्णा शिर्के यांच्या कुशल व अनुभवी मार्गदर्शनाखाली, फील्ड वर काम करणारे त्यांचे सहकारी तसेच ऑफिसमधील स्टाफ, कंपनीचे दैनंदिन कामकाज कार्यक्षमपणे पार पाडतात. मुंबई तसेच इतर शहरांत मिळालेलं यश आणि लौकिक सातार्‍यातही प्राप्त होईल अशी श्री. शिर्के आणि त्यांच्या टीमला मनोमन खात्री आहे.